
धुळे ।dhule। प्रतिनिधी
येथील मंगल कार्यालयात वधु-वरांवर अक्षदा टाकणे शिंदखेडा येथील महिलेस चांगलेच महागात पडले. अक्षदा टाकण्यासाठी हातातली पर्स (Purse in hand) खाली ठेवली. नजर हटताच चोरट्याने (thief) ती लंपास (Lumpas) केली. या पर्समध्ये 2 लाख 80 हजारांचे दागिने होते. याप्रकरणी आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदखेडा येथील प्रोफेसर कॉलनीत राहणार्या संध्या जयवंतराव बोरसे (वय 56) या दि.7 मे रोजी धुळ्यातील हॉटेल नालंदा शेजारी असलेल्या रिध्दी सिध्दी मंगल कार्यालयात लग्न समारंभात आल्या होत्या. दुपारी साडे अकरा वाजेच्या सुमारास वधु-वरांवर अक्षदा टाकण्यासाठी त्यांनी हातातली पर्स खाली ठेवली.
तेव्हा चोरट्याने ती हातोहात लंपास केली. या पर्समध्ये दोन लाखांचा सोन्याचा नेकलेस, 5 हजारांचे दीड ग्रॅमचे कानातले, 40 हजारांचा सोन्याचा नेकलेस, 4 हजारांचे 4 ग्रॅमचे कानातले, 2 हजारांचा पॉलिशचा नेकलेस व कानातले, 5 हजारांची सोन्याची अंगठी, 1 हजाराचे चांदीचे दागिने, 15 हजार रोख, 8 हजारांचा मोबाईल, हस्ती बँकेची चावी, आधार कार्ड असा एकूण 2 लाख 80 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल होता.
याप्रकरणी आझादनगर पोलिसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नवगिरे करीत आहेत.