दहा वर्षाच्या मुलासह आईने मारली तापीत उडी

दहा वर्षाच्या मुलासह आईने मारली तापीत उडी

धुळे । Dhule । प्रतिनिधी

तापी नदीवरील (Tapi River) गिधाडे पुलावरुन (vulture bridge) आज दुपारी आपल्या दहा वर्षाच्या मुलासह आईने (Mother with child) तापीनदीत उडी घेवून आत्महत्या (Suicide) केल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनास्थळी बॅग आणि काही वस्तू आढळून आल्याने त्यांची ओळख पटली.

शिरपूर तालुक्यातील वाडी येथील योगिताबाई रविंद्रसिंग गिरासे (वय 30) आणि तेजेंद्र रविंद्रसिंग राजपूत (वय 10) असे या दुर्दैवी मायलेकांचे नावे आहेत. ते शहादा तालुक्याती डोंगरगाव येथे गेले होते. आज 16 रोजी शिरपूर तालुक्यातील वाडी बुद्रुक येथे सासरी येण्यासाठी निघाले.

मात्र दुपारी त्यांनी तापी नदीत (river Tapi) उडी (Jumped) घेतली. पुलावर एका बॅग आढळून आली असून त्यात नाव व मोबाई नंबर लिहिलेली वही सापडल्याने त्यांची ओळख पटू शकली. काही वह्या आणि या महिलेची साडी देखील घटनास्थळी आढळली. नातेवाईकांचा सायंकाळी उशिरापर्यंत तापी पात्रात त्यांना शोधण्याचा प्रयत्न सुरु होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com