धुळ्यात लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

धुळ्यात लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
pune crime

धुळे । dhule प्रतिनिधी

लग्नाचे आमिष दाखवून (lure of marriage) शहरातील नकाणे तलाव येथे नेवून अल्पवयीन मुलीवर (minor girl) तरूणाने (young man) बलात्कार (rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तरूणावर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

साक्री रोडवरील महिंदळे शिवारातील आसाराम नगरात राहणार्‍या पिडीत 17 वर्षीय मुलीने शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जुलै 2022 ते दि.26 जानेवारी 2023 रोजी रोशन प्रकाश सोनवणे (वय 21 रा.जोरावली सोसायटी, साक्री रोड, धुळे) याने तिला साक्री रोडवरील महाविद्यालयात मिठी मारली. तसेच तिला नकाणे तलाव येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी सोबत नेले. तेथे लग्नाचे आमिष दाखवित तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच पिडीतेला जिवे मारण्यासह स्वतःही मरण्याची धमकी दिली. त्यानंतरही त्याने पिडीतेवर नकाणे तलाव येथे नेवून तिच्याशी वारंवार शारिरीक संबंध ठेवले.

याप्रकरणी रोशन सोनवणे याच्याविरोधात शहर पोलिसात भादंवि कलम 354, 354 (अ), 376 (2), (एन), 506, पोस्को कायदा कलम 4, 6 अ.जा.अ.ज प्रतिबंध अधि. 1989 सुधारणा 2015 प्रमाणे कलम 3 (1) (डब्ब्लु) (आय) (आयआय), 3 (2) (व्ही) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दादासाहेब पाटील हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com