पित्याच्या डोळ्यादेखत अल्पवयीन मुलीला पळविले

पित्याच्या डोळ्यादेखत अल्पवयीन मुलीला पळविले

धुळे । dhule । प्रतिनिधी

मॉर्निंग वॉक करुन घरी येणार्‍या पित्याच्या(father) डोळ्या देखत त्यांच्या सतरा वर्षीय मुलीला (seventeen-year-old girl) गावातील (village) तरुणाने (youth) पळवून नेले. (Abducted.)हीबाब लक्षात येताच त्यानी पाठलाग करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. सैय्यद नगर (ता.साक्री) येथे ही घटना घडली. याप्रकरणी साक्री पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सैय्यद नगर येथे राहणार्‍या मुलीच्या पित्याने साक्री पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ते दि.19 रोजी सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास मॉर्निग वॉक करून घरी येत होते. तेव्हा त्यांच्या घराजवळील रस्त्यावर गावातील विरेंद्र गोटू चव्हाण (वय 21) हा तरुण हा दुचाकी घेवून उभा होता.

त्याने फिर्यादीच्या 17 वर्षीय मुलीला इशारा करुन त्याच्या जवळ बोलविले. त्यानंतर तिला दुचाकीवर बसवून पळवून नेले. त्यादरम्यान मुलीच्या पित्याने त्यांचा पाठलागही करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी विरेंद्र चव्हाण विरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.देसले करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com