पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या पडला विहिरीत

पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या पडला विहिरीत

पिंपळनेर । Pimpalner

येथील दहिवेल रस्त्यावरील धवळी विहीर शिवारात पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या (leopard) खोल विहिरीत पडला. वनविभागाने पिंजरा लाऊन सुखरूप बाहेर काढुन बिबट्याला जंगलात सोडले.

मार्च महीन्यापासुन धवळीविहीर, रोहण, मैंदाणे, बोदगाव, चिंचपाडा शिवारात या बिबट्याने हैदोस माजवला होता. अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला होता. धवळीविहीर, दहीवेल रस्त्यावर त्याचा मुक्त संचार वाढला होता. त्यामुळे जनतेत भितीचे वातावरण होते. कांदा, गहु पिकांना रात्री पाणी भरण्यासाठी शेतकरी धजावत नव्हता.

परीसरातील नागरिकांनी वनविभागाकडे लेखी तक्रार देऊनही लक्ष दिले जात नव्हते. बिबट्या रोज नवनवीन शिकार करतच होता. तो काल रात्री पाण्याच्या शोधात धवळीविहीर येथील तात्या मोतीराम साबळे यांच्या खोल विहिरीत पडला. सकाळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. कोंडायबारी वनविभागाने घटनास्थळी जाऊन पहाणी करून पिंझरा लावला. बिबट्याला सुखरुप बाहेर काढुन जंगलात सोडुन दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com