
साक्री Sakri । प्रतिनिधी
साक्री शहरातील बीपी जैन पेट्रोलपंप (BP Jain Petrol Pump) शेजारी साक्री - धुळे मार्गावरील किराणा दुकान (Grocery store) फोडून (breaking) अज्ञात चोरटयाने (unknown thief) किराणा माल व गल्ल्यातील रोकड असा 67 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून (stealing the material) नेला. याबाबत साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.
साक्री शहरातील बीपी जैन पेट्रोलपंप शेजारी साक्री - धुळे मार्गावर मयुर साहेबचंद जैन यांच्या मालकीचे काकाजी प्रोव्हिजन किराणा दुकान आहे. आज सकाळी 8 वाजता कामावरील मजुरासह दुकानात आलो. दुकान उघडले असता दुकानातील किराणा माल अस्ताव्यस्त केलेेला दिसून आला. तसेच छताचे पीओपी व लोखंडी पत्रा असे उचकावलेले दिसून आले. अज्ञात चोरटयाने किराणा माल चोरुन नेला.
अज्ञात चोरटयाने 21 हजार 600 रुपये किंमतीचे काजुचे 250 ग्रॅमचे एकुण 90 पाकिटे, 21 हजार रुपये किंमतीचे अंजीरचे 250 ग्रॅमचे एकुण 70 पाकिट, 25 हजार 200 रुपये रोकड किराणा दुकानात गल्ल्यात ठेवलेले असे एकुण 67 हजार 800 रुपये किंमतीचा किराणा माल व रोकड असा मुद्देमाल चोरून नेला. अशी फिर्याद मयुर साहेबचंद जैन यांनी साक्री पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भानुदास नरे हे करीत आहेत.