धुळ्यात हॉटेलमध्ये तरूणीवर अत्याचार

धुळ्यात हॉटेलमध्ये तरूणीवर अत्याचार

धुळे । Dhule

शहरातील एका हॉटेलमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर त्या तरुणीचे फोटो तिच्या मैत्रीणीला व आतेभावाला पाठवून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अहमदनगरच्या तरूणावर आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहरातील ऐंशी फुटी रोड परिसरात राहणार्‍या 21 वर्षीय तरुणीने आझादनगर पोलिसात दिलेल्या फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अहमदनगर येथील काकासाहेब हरीदास दहीफळे (वय 23) या तरुणाने तरूणीला ऑक्टोबर 2021 मध्ये धुळ्यातील एका हॉटेलमधील रुममध्ये नेले.

तेथे नेल्यानंतर तिला मारहाण करुन तिच्यासोबत आक्षेपार्ह अवस्थेत सेल्फी काढण्यास भाग पाडले. तसेच तिच्याशी जबरीने शारिरीक संबध प्रस्थापित केले. याबाबत कोणाला काही सांगितल्यास तुझे फोटो व्हायरल करेल व तुझ्या घरच्यांना सांगेल, अशी धमकीही तिला दिली. त्यानंतर 18 जुलै 2022 रोजी पिडीत तरुणीची मैत्रीण व आतेभावाला टेलिग्रामवर तरुणीचे फोटो पाठविले व त्याला शिवीगाळ करुन धमकी दिली.

त्यानुसार आझादनगर पोलिस ठाण्यात तरूणाविरोधात भादंवि कलम 376, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एल.एस.करंकार करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com