वैभव नगरात डॉक्टराचे घर फोडले

40 हजाराच्या रोकडसह लाखोंचे दागिने लंपास, गुन्हा दाखल, श्वानाला माग गवसला नाही
वैभव नगरात डॉक्टराचे घर फोडले

धुळे । Dhule प्रतिनिधी

शहरातील गोळीबार टेकडी (Golibar Hill area) परिसरातील वैभव नगरात (Vaibhav Nagar) डॉक्टराचे घर (doctor's house) चोरट्यांनी फोडून (Thieves broke) 40 हजाराच्या रोकडसह लाखोंचे दागिने लंपास केले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गोळीबार टेकडीसमोर वैभव नगर वसाहत आहे. या वसाहतीतील प्लॉट नं.47 मध्ये रतनेश बंगला असून तेथे दातांचे डॉक्टर विशाल वाणी हे कुटूंबियांसह राहतात. डॉ. वाणी यांच्यासोबत राहणारे त्यांचे आई-वडील 20-25 दिवसांपुर्वी बंगलोरला मोठ्या भावाकडे गेले होते. गेल्या दोन दिवसांपासून डॉ. विशाल वाणी यांच्या लहान मुलीची प्रकृती खराब असल्याने तिला अशोक नगर येथील संगोपन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुलगी लहान असल्याने डॉक्टर दाम्पत्य तिच्यासोबत होते. तर त्यांची मोठी मुलगी शाळा असल्याने शेजार्‍यांकडे राहत होती.

आज सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास डॉ.वाणी यांची पत्नी मुलीला शाळेत पाठविण्यासाठी घरी आल्या असता त्यांना घराच्या दरवाजाची कडी तुटलेली दिसली. त्यांनी घरात डोकावून पाहिले असता घरात साहित्य अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला. त्यामुळे सौ.वाणी यांनी त्वरीत डॉ. विशाल वाणी यांना घटनेची माहिती दिली. डॉ.वाणी हे घरी आल्यानंतर त्यांनी शहर पोलिसांना (police) माहिती दिली.

त्यानंतर शहर पोलिस ठाण्याचे पथक, श्वान पथक, ठसे तज्ज्ञ, एपीआय राजपूत, एलसीबीचे धनगर हे घटनास्थळी दाखल झाले. श्वानाने वैभव नगरच्या एका टोकापर्यंत माग काढला. चोरट्यांनी घरातून 40 हजारांची रोकड आणि लाखो रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे, लगड चोरुन नेली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्यांनी डॉ.विशाल वाणी यांच्या घरा डल्ला मारला. काही दागिन्यांवर चोरट्यांची नजर पोहचली नाही. सौ.वाणी यांच्या सोन्याच्या बांगड्या आणि चांदीची भांडी चोरट्यांच्या नजरेतून सुटले त्यामुळे लाखो रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरट्यांच्या हाती जाण्यापासून बचावल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com