ट्रकच्या धडकेत बालकाचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत बालकाचा मृत्यू

शिंदखेडा । Shindkheda । प्रतिनिधी

शिंदखेडा-विरदेल रस्त्यावर काकाजी मंगल कार्यालयासमोर भरधाव ट्रकने (truck) रस्ता ओलांडणार्‍या (Crossing the road) बालकाला (child)जोरदार धडक दिली.त्यात बालकाचा जागीच मृत्यू (Death) झाला. या घटनेनंतर मोठी गर्दी झाली होती.

शहरातील काकाजी मंगल कार्यालयात आयोजित विवाह सोहळ्यासाठी सुरत येथून संदीप गोरख पाटील (वय 25 रा.सुरत, उधना) व त्यांच्याकडे राहत असलेल्या त्यांच्या भगिनी रेखाबाई कैलास पाटील व त्यांचा मुलगा मनोहर कैलास पाटील (वय 8) (रा.शिवदर्शन सोसायटी, उधना, सुरत) हे देखील आले होते.

विवाह सोहळा आटोपल्यानंतर संदीप पाटील (मामा) व मनोहर पाटील (भाचा) हे दुपारी 2.40 ते 2.45 वाजेच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला असणार्‍या रसवंतीवर उसाचा रस पिऊन परत येत होते. यावेळी मनोहर अचानक मामाचा हात सोडून रस्ता ओलांडायला पळाला.

यावेळी विरदेलकडून येणार्‍या भरधाव ट्रकवरील (क्र.एमएचपी- 8782) चालक नजूरुद्दीन बशिरुद्दीन शेख (वय 45 रा.मुल्लावाडा, कासोदा रोड, एरंडोल जि.जळगाव) याने दुर्लक्षितपणे वाहन चालवित त्याला जोरदार धडक दिली. त्यात मनोहर याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मोठ्याप्रमाणात गर्दी जमा झाली.

मनोहर यास तत्काळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉ.कुंदन वाघ यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. बालकाच्या अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com