नात्याला काळीमा... सख्ख्या काकानेच केले अल्पवयीन पुतणीला गरोदर

नात्याला काळीमा... सख्ख्या काकानेच केले अल्पवयीन पुतणीला गरोदर

धुळे - dhule

जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आपल्या अल्पवयीन पुतणीवरच काकाने वारंवार अत्याचार करीत तिला गरोदर केले. शिरपूर तालुक्यातील एका पाड्यावर ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिसांत काकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर काका फरार झाला असून पोलिसांनी त्याचा कसून शोध सुरू केला आहे.

याबाबत पाड्यावर हणार्‍या पीडितेच्या आईने शिरपूर तालुका पोलिसांना फिर्याद दिली. त्यानुसार, त्यांची मुलगी शेतात पाणी भरण्यासाठी व गायीला चारा कापायला गेली असता तेथे मुलीचा काका बाट्या चतुरसिंग पावरा (वय ४०) हा आला. त्याने तिला धमकी देवून तिच्यावर कपाशीच्या शेतात अत्याचार केला.

नात्याला काळीमा... सख्ख्या काकानेच केले अल्पवयीन पुतणीला गरोदर
पोलीस गस्तीपथकाच्या वाहनाला ट्रकची धडक

चार महिन्यांपूर्वी ही घटना घडली. त्यामुळे पिडीतेला दिवस राहिले, त्यात तिचे पोट पुढे आल्याने तिच्या आईला शंका आली. त्यांनी मुलीला विश्‍वासात घेत विचारपूस केली असता हकीकत सांगितली. काकानेच अत्याचार केल्याचे सांगितल्याबरोबर कुटुंबियांना मोठा धक्का बसला. पीडितेच्या आईने बाट्या पावराविरुद्ध काल पोलिसात फिर्याद दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com