97 हजाराचा बनावट खतसाठा जप्त, तिघांवर गुन्हा

धुळे व जळगाव जिल्हा कृषी विभागाची संयुक्त कारवाई
97 हजाराचा बनावट खतसाठा जप्त, तिघांवर गुन्हा

धुळे । dhule । प्रतिनिधी

शेतकर्‍याने (farmer) कृषी विभागाकडे (Department of Agriculture)पोटॅश खताच्या गुणवत्तेविषयी तक्रार (complaint) केल्यामुळेे धुळे व जळगाव जिल्हा कृषी विभागाने (Dhule and Jalgaon District Agriculture Department) संयुक्त कारवाई (action) करून 97 हजाराचा बनावट खतसाठा (Fake fertilizer stock) शिरपूर तालूक्यातील तोंदे येथून जप्त (seized) केला आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

97 हजाराचा बनावट खतसाठा जप्त, तिघांवर गुन्हा
धुळे-दादर त्रि-साप्ताहिक विशेष रेल्वेला सुरवात

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार रमेश शिसोदे यांनी थाळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.27 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जिल्हा गुण नियंत्रण निरिक्षक जळगाव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरूण श्रीराम तायडे यांनी भ्रमणध्वनीवर मौजे हातेड खु. ता.चोपडा येथील शेतकरी किशोर आत्माराम पाटील यांनी (एमओपी) या खताच्या गुणवत्तेविषयी तक्रार केली. त्यावर तालुका कृषी अधिकारी चोपडा दीपक भास्करराव साळुंखे व अरूण श्रीराम तायडे यांनी सदर शेतकर्‍याकडे जावुन खताची तपासणी केली. त्यांना सदर खतसाठा प्रथमदर्शनी बनावट असल्याचे आढळून आले. त्यांनी किशोर पाटील यांच्याकडे अधिक चौकशी केली असता मंगलचंद झुंबरलाल जैन मु.पो.तोंदे, ता.शिरपूर यांनी त्यांना खताच्या सात बॅग दिल्याचे सांगितले. (प्रती बॅग 1700 रूपये) मात्र या बदल्यात जैन याने कुठलेही बिल अथवा पावती दिलेली नव्हती. त्यामुळे बनावट खतसाठा असल्याचे समोर आले.

त्यानंतर किशोर पाटील यांच्याकडे असलेल्या बनावट खताच्या पिशव्या परत करण्यास सांगून कृषि सहसंचालक नाशिक विभाग मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, जिल्हा अधीक्षक कृशी अधिकारी जळगावचे संभाजी ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. दि.27 एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास संशयित ठिकाणी म्हणजेच सुरजमल मोहनलाल जैन यांच्या किराणा दुकानावर छापा टाकला असता या ठिकाणी 96 हजार 900 रूपये किंमतीच्या बनावट खताच्या 57 बॅग आढळून आल्या.

अधिक चौकशीत हा खत साठा कैलास वासुदेव पाटील रा.तोंदे यांनी त्यांच्या घरात कापुस भरला असल्याने जागा नसल्याने किशोर पाटील यांना सांभाळण्यास दिल्याचे सांगितले. त्यावरून कैलास वासुदेव पाटील याची चौकशी करण्यात आली. कैलास पाटील याने उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी मंगलचंद झुंबरलाल जैन कैलास वासुदेव पाटील दोघे रा.रा.तोंदे, ता.शिरपूर व किशोर शालिकराव पाटील रा.करवंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.

सदरची कारवाई मोहन वाघ , जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी धुळे, कुरबान तडवी व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी जळगाव, संभाजी ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज शिसोदे जिल्हा गूणवत्ता नियंत्रण निरीक्षक धुळे, अरुण तायडे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जळगाव, दिपक साळुंखे तालुका कृषी अधिकारी चोपडा, योगेश गिरासे कृषी अधिकारी शिरपूर यांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com