कंटेनरमधून 76 लाखांची औषधी लंपास

चोरी
चोरी

धुळे । प्रतिनिधी dhule

शिरपूरात (shirpur) उभ्या कंटेनरमधून चोरट्यांनी तब्बल 76 लाखांची औषधी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

ट्रक चालक आसुकुमार रामजित कनोजिया (वय 34 रा.अमावा कला पोस्ट पट्टी नरेंद्रपुर तहसील, शहागंज जनपत, जीनपुर, उ.प्र) याने शिरपूर शहर पोलिसात तक्रार दिली.

दिलेल्या तक्रारीनुसार, त्याने त्यांच्या ताब्यातील कंटनेर दि.4 जानेवारी रोजी तिरंगा हॉटेल येथे उभे केलेले असतांना पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कंटेनरचे रबरी सील व कुलूप तोडून त्यातील विविध औषधीचे तब्बल 52 बॉक्स लंपास केले. त्याची किंमत 76 लाख 55 हजार 224 रूपये इतकी आहे. या घटनेचा गुन्हा नुकताच नोंदविण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक किरण बार्‍हे हे पुढील तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com