11 वर्षीय मुलीवर 71 वर्षीय नराधमाने केला अत्याचार

11 वर्षीय मुलीवर 71 वर्षीय नराधमाने केला अत्याचार

धुळे । Dhule । प्रतिनिधी

चारा तोडून देण्याचे आमिष दाखवून (Showing the lure) अकरावर्षीय अल्पवयीन मुलीवर (On a minor girl) 71 वर्षाच्या नराधमाने (Naradhamane) सावळदे शिवारात लैंगिक अत्याचार (Sexual harassment) केला. याबाबत पीडितेच्या आईने केलेल्या तक्रारीवरून मोहाडी पोलिस ठाण्यात (Mohadi Police Station) नराधमाविरूध्द गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

शांताराम शिवराम अहिरे (वय 71) असे संशयिताचे नाव असून पोलिसांनी आज सकाळी दहाच्या सुमारास मोहाडी उपनगरातील दंडेवालाबाबा नगरमधील घरातून ताब्यात घेतले.

2 नोव्हेंबरला 11 वर्षीय मुलगी दुपारी एक ते सायंकाळी सहाच्या दरम्यान बोकडासाठी चारा घेऊन येते असे सांगून घरातून निघाली. त्यावेळी शांताराम अहिरे याने रेल्वे पट्ट्याजवळ चारा तोडून देण्याचे आमिष दाखवून तिला त्याच्यासोबत सायकलवर बसवून सावळदे शिवारातील शेतात नेले. तेथे पीडितेवर जबरदस्तीने बलात्कार केला व याबाबत कुणाला काही सांगितल्यास पीडितेसह तिच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे पीडिता घाबरून गेली. तिने त्या दिवशी घटनेबाबत काहीच घरी सांगितले नाही. घटनेनंतर पीडितेच्या पोटात दुखू लागले. यानंतर सोमवारी तिने तिच्या आईला घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. यानंतर तिच्या आईने सासू व अन्य नातेवाइकांशी चर्चा करून सोमवारी रात्री उशिरा या घटनेबाबत मोहाडी उपनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी शांताराम शिवराम अहिरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com