पिकअपमधून 7 लाखांचा गुटखा जप्त

लळींग शिवारात मोहाडी पोलिसांची कारवाई
पिकअपमधून 7 लाखांचा गुटखा जप्त

धुळे । Dhule । प्रतिनिधी

येथील मोहाडी पोलिसांनी (Mohadi police) मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लळींग शिवारात (Laling Shivara) आज पहाटे सापळा रचत गुटख्याची अवैध वाहतूक (Illegal transport gutkha) रोखली. वाहनातून तब्बल सात लाखांचा गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला. चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावरून मालेगावकडे पिकअप (pickup) (क्र.एमएच-19/सीडब्ब्लू-4474) वाहनातून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची (gutka) अवैध वाहतुक (Illegal transport) होत असल्याची गुप्त माहिती मोहाडी पोलिस ठाण्याचे सपोनि भूषण कोते यांना मिळाली. त्यांनी तत्काळ कारवाईसाठी पथकाला रवाना केले.

पथकाने पेट्रोलींग करीत लळींग गावशिवारात ((Laling Shivara)) हॉटेल सिटी पॉइंटजवळ संशयीत वाहनाला पकडले. चालकाने त्याचे नाव शुभम उमेश पवार (वय 19 रा. सावखेडे तुर्क (ता.पारोळा जि.जळगाव) असे सांगीतले. त्याला वाहनातील मालाबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे वाहनाची तपासणी केली असता त्यात विमल पान मसाला व सुगंधीत तंबाखुचा साठा आढळुन आला. एकुण 6 लाख 97 हजार 200 रुपये किंमतीचा गुटखा (gutka seized) व दोन लाखांचे वाहन असा मुद्येमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांच्या फिर्यादीवरून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भुषण कोते, असई बापु दाभाडे, पोना बाबुलाल माळी, किरण कोठावदे, पोकॉ मुकेश जाधव यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.