धुळे जिल्ह्यात ६५ टक्के मतदान

धुळे जिल्ह्यात ६५ टक्के मतदान

जि.प., पं.स. पोटनिवडणूक, अनुचित घटना नाही

धुळे । Dhule । प्रतिनिधी

जिल्ह्यात जि.प., पं.स. पोटनिवडणूकीसाठी सुमारे 65 टक्के मतदान झाले. त्यात शिरपूर तालुक्यात 57.12, शिंदखेडा तालुक्यात 58.83 तर साक्री तालुक्यात 55.55 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडलेली नाही. 114 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. उद्या दि. 6 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाने तयारी पुर्ण केली आहे.

जिल्हा परिषदेच्या 15 गट तर पंचायत समितींच्या 30 गणांसाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. माघारीअंती धुळे तालुक्यातील बोरकुंड गट तर शिरपूर तालुक्यातील करवंद गण, विखरण गण असे तीन उमेदवार बिनविरोध झाले. त्यामुळे 14 गटांसाठी 42 तर 28 गणांसाठी 72 असे एकूण 114 उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांचे भवितव्य आज मतदार यंत्रात बंद झाले आहे.

सकाळी 7.30 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी 9.30 वाजेपर्यंत धिम्या गतीने जिल्ह्यात 9.74 टक्के मतदान झाले. त्यात धुळे तालुक्यात 9.66, साक्री तालुक्यात 8.20, शिंदखेडा तालुक्यात 9.90 तर शिरपूर तालुक्यात 12.24 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मात्र मतदानासाठी मतदार घराबाहेर पडले. दुपारी 1.30 वाजेपर्यंत 33.91 टक्के मतदान झाले. त्यानंतर मात्र मतदानाचा वेग वाढला. दुपारी 3.30 वाजेपर्यंत 46.37 टक्के मतदान झाले.

दुपारी 4 वाजेनंतर मतदार मतदानासाठी बाहेर पडल्यामुळे मतदान केंद्रांवर रांगा लागल्या. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत जिल्ह्यात सुमारे 65 टक्के झाले. त्यात शिरपूर तालुक्यात 57.12, शिंदखेडा तालुक्यात 58.83 तर साक्री तालुक्यात 55.55 टक्के मतदान झाले.

शिरपूर तालुक्यात 57.12 टक्के मतदान- शिरपूर तालुक्यात पंचायत समितीच्या सहा गणांसाठी 57.12 टक्के मतदान झाले. उद्या दि. 6 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

विखरण बु. व करवंद हे दोन गण यापूर्वीच बिनविरोध झाले आहेत. अर्थे खु. 49.33 टक्के मतदान, तर्‍हाडी त.त. 58.39 टक्के, वनावल 55.45 टक्के, जातोडा 59.54 टक्के, शिंगावे 67.33 टक्के, अजनाड 54.02 टक्के मतदान झाले.

या पोटनिवडणुकीत 28 हजार 292 महिला व 29 हजार 752 पुरुष असे एकूण 58 हजार 44 मतदार होते. त्यापैकी 15 हजार 722 स्री मतदार व 17 हजार 433 मतदार असे एकूण 33 हजार 155 मतदारांनी मतदानाचा हक्क बजविला.

सहा सप्टेंबरला शिरपूर तहसील कार्यालयात मतमोजणी होणार असून एकूण सहा टेबलांवर मतमोजणी होणार आहे. एका तासात सर्व निकाल जाहीर होतील अशी शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com