धुळे विभागातील 56 एसटी कर्मचारी निलंबित

चौथ्या दिवशी संप सुरुच, संपाला भाजपासह विविध स्तरातून पाठिंबा, 750 डेपोंमध्ये बसेस उभ्या
धुळे विभागातील 56 एसटी कर्मचारी निलंबित

धुळे Dhule । प्रतिनिधी

एस.टी. कर्मचार्‍यांच्या (ST employees) सलग चौथ्या दिवशी संप सुरुच असून संप चिरडण्यासाठी (crush the strike) शासनाने (government) कठोर भूमिका (Strict role) घेतली आहे. धुळे विभागातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील 56 कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई (Suspension action against 56 employees) करण्यात आली आहे अशी माहिती विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ (Department Controller Manisha Sapkal) यांनी दिली आहे. 750 एस.टी. बसेस विविध डेपोंमध्ये उभ्या आहेत. संपाला भाजपासह विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे.

धुळे जिल्ह्यातील दीड हजार बसफेर्‍या रद्द झाल्याने एक कोटीहून अधिक आर्थिक नुकसान झाले आहे. बसेस बंद प्रवाशी खासगी वाहनांचा आधार घेत आहेत. परंतु खासगी वाहनचालक जास्तचे दर आकारत आहेत.

संपामुळे धुळे विभागातील 56 कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई होत असल्यामुळे कर्मचार्‍यांनी संताप व्यक्त केला आहे. आज कर्मचार्‍यांच्या संपाला भाजपाचे नेते व माजी आ.राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रदीप कर्पे, उपमहापौर भगवान गवळी, हिरामण गवळी, युवराज पाटील, देवेंद्र सोनार, शशि मोगलाईकर, राजेश पवार, डॉ.माधुरी बाफना, यशवंत येवलेकर आदी पदाधिकार्‍यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

तसेच तृतीयपंथांनी देखील संपाला पाठिंबा दिला आहे. आंदोलनस्थळी पार्वती परशुराम जोगी, निलु पार्वती जोगी, अलका जोगी, निलिमा जोगी, शबनम जोगी, अंबु जोगी, किरण जोगी, फिजा जोगी यांनी सहभाग घेतला.

भीम आर्मी संघटनेनेही संपाला पाठिंबा दिला आहे. याबाबत राज्य परिवहन कर्मचारी संघटना व संघर्ष समितीला पत्र दिले आहे. पत्रावर जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण, प्रदेश महासचिव रामकृष्ण नेरकर, किशोर उशिरे, संजय अहिरे, भैय्यासाहेब वाघ, किरण भालेराव, कैलास गर्दे, जितू माहिते यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com