
दोंडाईचा Dondaicha । प्रतिनिधी
माजी मंत्री तथा शिंदखेडा मतदारसंघाचे आ.जयकुमार रावल (MLA. Jayakumar Rawal) यांच्या पाठपुराव्यामुळे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या (Civil Local Self-Government) परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधाची कामे या योजनेअंतर्गत शिंदखेडा नगरपंचायत (Shindkheda Nagar Panchayat) अंतर्गत विविध कॉलन्यामध्ये रस्ता काँक्रीटीकरणासाठी (Road concreting) 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर (Funding approved) झाला आहे. राज्यात सत्ताबदल होताच मागील अडीच वर्षापासून बंद असलेला निधीचा ओघ पुन्हा सुरू झाला असल्याची प्रतिक्रिया आ. रावल यांनी दिली आहे.
यात शिंदखेडा शहरातील वॉर्ड क्र.1 मध्ये रस्ता काँक्रीटीकरण करणे यासाठी 1 कोटी 25 लक्ष रुपये, वॉर्ड क्र. 2 मध्ये रद्ता काँक्रीटीकरण करणे यासाठी 1 कोटी रुपये, वॉर्ड क्र.3 मध्ये रस्ता काँक्रीटीकरणा साठी 50 लक्ष रुपये, वॉर्ड क्र 4,5,6 मध्ये रस्ता काँक्रीटीकरणासाठी 1 कोटी 25 लक्ष रुपये, तसेच वॉर्ड क्र. 10 मध्ये काँक्रीटीकरणा साठी 1 कोटी रुपये असा एकूण 10 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
यामुळे मागील अडीच वर्षाच्या काळात राज्य सरकारकडून येणारा निधी बंद झाला होता परंतु राज्यात सत्ताबदल होताच पुन्हा निधीचा ओघ सुरू झाला असल्याची प्रतिक्रिया आ.रावल यांनी व्यक्त केली आहे.
सत्ता बदलताच मतदार संघात निधीचा ओघ पुन्हा सुरु
राज्यात मागील अडीच वर्षापासून महाविकास आघाडी सरकारने निधी वाटपाबाबत दुजाभाव केला होता. राज्यात भाजपा सेनेची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकपयोगी कामांचा धडाका लावलेला आहे. यात पेट्रोल, डीझेल यांच्यावरील राज्य सरकारचा कर कमी करणे, नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना अनुदान देणे, शेतकर्यांना कुसुम योजनेतुन व राज्यसरकार कडून सौरऊर्जा पंप उपलब्ध करून देणे अश्या कामांचा धडाका लावलेला आहे.
मागील अडीच वर्षात निधी वाटपाच्या दुजाभावामुळे शिंदखेडा मतदारसंघात विकासाचा वेग मंदावलेला होता परंतु सत्ता बदल होताच अवघ्या 10 ते 15 दिवसात पुन्हा निधीचा ओघ सुरू झाला असून हा ओघ असाच सुरू राहील अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आ.जयकुमार रावल यांनी व्यक्त केली आहे.