भाजपच्या 47 नगरसेवकांना पाठविणार तुरुंगात

शिवसेनेचा पत्रकार परिषदेत आरोप , योजनांच्या निधीतून सत्ताधार्‍यांचा विकास
भाजपच्या 47 नगरसेवकांना पाठविणार तुरुंगात

धुळे Dhule । प्रतिनिधी

महापालिकेतील (Municipal Corporation) सत्ताधार्‍यांनी (authorities) प्रचंड भ्रष्टाचार (Corruption) केला. धुळेकरांच्या डोळ्यात फक्त धुळफेक केली अनेक योजनांमधून शहराचा तर विकास झालाच नाही मात्र सत्ताधार्‍यांचा झाला असल्याचा आरोप (Allegations) शिवसेनेचे (Shiv Sena') महानगरप्रमुख मनोज मोरे (metropolitan chief Manoj More) यांनी केला. जळगाव प्रमाणे 52 पैकी किमान 47 नगरसेवक (corporators) तुरुंगात (sent to jail) जातील, असाही दावा (Claim) सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी (Mahesh Mistry) यांनी केला.

शहरासाठी 23 कोटी रुपयांचा निधी आम्हीच आणला, यावरून सेना-भाजपात श्रेयवाद सुरू झाला आहे. नुकतेच महापौर प्रदीप कर्पे आम्ही निधी आल्याचे सांगितले होते. त्या पार्श्वभुमीवर आज शिवसेनेेने कल्याण भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.तुळशीराम गावीत, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख सतीष महाले, डॉ.सुशिल महाजन, राजेश पटवारी, गुलाब माळी, ललीत माळी, संजय गुजराथी, संजय वाल्हे, संदीप चव्हाण, संदीप सूर्यवंशी, शेखर वाघ आदी उपस्थित होते.

मनोज मोरे पुढे म्हणाले की, कचरा संकलनासाठी 17 कोटींचे टेंडर होते. 3-4 कंपन्यांनी टेंडर भरले. त्यात मी ही भागिदार होतो. तो माझा व्यवसाय आहे. माझ्याबरोबरच इतर पाच जण ठेकेदार होते. ते भाजपाचे आहेत. व्यवसाय करण्यात गैर काय? असा प्रश्न करत त्यांनी खोटी बिले काढणे हे गैर आहे. मी 5-6 महिने या ठेक्यात होतो तोपर्यंत कामही चांगले होते. मात्र भैय्यांसह प्रत्येकाला पाकीट हवे होते.

भैय्याने 25 लाख रुपये घेतल्याचा आरोपही मनोज मोरे यांनी यावेळी केला. मला भाजपामध्ये बोलवून माझी फसवणुक केल्याचा आरोपही त्यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून पक्षसंघठण बांधणीबाबत विषय होते. त्यामुळे आमचे त्यावर लक्ष होते. नगरविकास खात्याने 101 कोटी पैकी सुरुवातीला काही निधी दिला. त्यातून कामे करण्यात आली. मात्र भैय्याने भरमसाठ टक्केवारी घेतल्याने कामे निकृष्ठ दर्जाची झाली.

भाजपाच्या या कारणाम्यांमुळेच निधी थांबवला होता. परंतु सेनेची भुमिका 80 टक्के समाज कारणाची आहे. राजकारण बाजूला ठेवत सरकारने निधी दिला आहे. पालिकेतील बांधकामसह 4 खात्यांचे स्पेशल ऑडिट करुन एसआयटी नेमण्याची आमची मागणी होती. त्याची प्रक्रिया सुरु आहे. याबाबतचे निवेदन नगरविकास मंत्र्यांना दिले त्याचवेळी निधीबाबतचेही निवेदन दिले. सेनेेचे खा.संजय राऊत यांच्याकडे आम्ही देवपुरच्या रस्त्यांसाठी 50 कोटी रुपयांंची मागणी केली आहे.

वास्तविक पाहता नगरोत्थानमध्ये महापालिकेने जे रस्ते घ्यायला हवे होते ते घेतले नाही. मोठ्या 2-4 ठेकेदारांना काम मिळेल अशा पध्दतीने कामे मांडली गेली. त्यामुळे भाजपाने मोठ्या ठेकेदारांशी भागिदारी करुन शहराला खड्ड्यात घालण्याचे काम केले. श्रेय जरुर घ्या पण त्यासाठी नैतिकता असावी लागते ती भाजपाकडे नाही, पैसे खाल्ल्यामुळे ते ठेकेदाराला बोलू शकत नाही. ठेकेदारांना बोलण्याचे काम सेनेेने केले आहे. असल्याची टीकाही त्यांनी केली. तसेच प्रदीप कर्पे यांच्या महापौर पदाबाबतही टिका टिप्पणी केली.

देवपूरातील वाडीभोकर रस्त्यावर टाकण्यात आलेला मुरुम आणि 23 कोटींचा निधी यांचा काही एक संबंध नाही. सेनेच्या आंदोलनामुळे संबंधीतांना काम करायला भाग पाडले गेले. साक्रीरोडच्या निकृष्ठ कामाची चौकशी होणार असल्याचेही मनोज मोरे यांनी सांगितले. महापालिकेला मिळालेल्या 500-600 कोटीतुन शहराचा नव्हेतर सत्ताधार्‍यांनी स्वतःच विकास करुन घेतले.

आंदोलन कसे करायचे हे आम्हाला शिकवू नका. फोटो छाप काम आणि आंदोलन आम्ही करत नाही. जळगाव प्रमाणे 52 पैकी किमान 47 नगरसेवक तुरुंगात जातील, असाही दावाही शेवटी सेनेचे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी यांनी केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com