पालिकेच्या 400 कर्मचार्‍यांना मिळाली थकीत रक्कम

आ.जयकुमार रावल यांनी शब्द पाळला
पालिकेच्या 400 कर्मचार्‍यांना मिळाली थकीत रक्कम

दोंडाईचा Dondaicha । प्रतिनिधी

येथील नगरपालिकेचे (municipality) सेवानिवृत्त कर्मचारी (Retired employees) तसेच कार्यरत कर्मचारी यांना गेल्या अनेक वर्षापासुन 6 वा वेतन आयोग, 7 वा वेतन आयोग, ग्रॅज्युईटी, रजेचा पगार अशी मोठी थकबाकी (Arrears )पालिकेकडे होती. गेली अनेक वर्ष त्याकडे कुणीही लक्ष दिले नव्हते. पंरतू कर्मचारी संघटनांनी माजी मंत्री आ.जयकुमार रावल (MLA Jayakumar Rawal)यांच्याकडे ही मागणी केल्यानंतर त्यांनी तातडीने 1 कोटी 5 लाखाची थकित रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. आज त्याचे वितरण पालिकेच्या सहकारमहर्षी दादासाहेब रावल सभागृहात नगराध्यक्षा सौ.नयनकुंवरताई रावल (Mayor Nayankunwartai Rawal ) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे माजी मंत्री आ.जयकुमार रावल यांनी कर्मचार्‍यांना दिलेला शब्द पाळला, असाच गौरवोदगार यावेळी कर्मचार्‍यांमधुन निघत होता. या रकमेचा सेवानिवृत्त तसेच कार्यरत असलेल्या 400 कर्मचार्‍यांना लाभ मिळणार आहे.

याप्रसंगी शिखर बँकेचे माजी विभागीय अध्यक्ष सरकारसाहेब रावल, माजीमंत्री आ.जयकुमार रावल, उपनगराध्यक्ष नबु पिंजारी, उपमुख्याधिकारी हर्षल भामरे, शिक्षण सभापती मंगला धनगर, महाराष्ट्र न.पा.सेवानिवृत्त कर्मचारी संघटना अध्यक्ष पी.के.चौधरी, न.पा.कर्मचारी संघटना अध्यक्ष रघुनाथ बैसाणे, सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवा सोलंकी, विजय तावडे, गनी शेख, बांधकाम सभापती निखील जाधव, प्रविण महाजन, जितेंद्र गिरासे, कृष्णा नगराळे, राजेश जाधव, नरेंद्र कोळी, ईश्वर धनगर, चिरंजीवी चौधरी, हितेंद्र महाले, विजय मराठे, सुफियान तडवी, नरेंद्र गिरासे, मनोज निकम आदी उपस्थित होते.

आ.रावल म्हणाले की, दोंडाईचा पालिकेत सेवा बजावून सेवानिवृत्त होणारा कर्मचारी हा आनंदाने घरी गेला पाहिजे. पंरतू याकडे मागील काळात कुणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे मोठी थकबाकी वाढली आहे. आजच्या स्थितीत संपूर्ण रक्कम देता येणे शक्य नाही. पंरतू याबाबत ठराव करून मालमत्ता कर वसुलीच्या दहा टक्के रक्कम आता कर्मचार्‍यांच्या थकित रक्कमेसाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे येत्या दोन वर्षात सेवानिवृत्त होणार्‍या कर्मचार्‍याला त्याच दिवशी वेतन आयोगाचा फरक, ग्रज्युईटी, रजेचा पगार आदी सर्व रक्कम देण्यात येईल आजपर्यत वसुलीच्या रकमेतून 10 टक्के रक्कम आरक्षित ठेवण्याचा निर्णय कुणीही घेतलेला नव्हता. पालिकेच्या इमारतीप्रमाणे पालिकेत सुविधा असावी याठिकाणी आलेला सर्वसामान्य नागरीक असो किंवा कर्मचारी असो सर्वांचे समाधान व्हावे हाच हेतू पालिकेचा यापुढे राहील, तशा सूचना पक्षाचे नेता म्हणून नगरसेवकांना दिलेल्या आहेत, असेही आ.जयकुमार रावल यांनी यावेळी नमुद केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com