धुळे जिल्ह्यात 34 पॉझिटिव्ह

धुळे जिल्ह्यात 34 पॉझिटिव्ह

धुळे । Dhule। प्रतिनिधी

जिल्ह्यात सलग पाच दिवसांपासून दोन आकडी रूग्ण संख्या आढळून येत आहे. रविवारी दिवसभरात 34 कोरोना बाधित (corona obstruction) रूग्ण (Patients) आढळून आले. त्यात सर्वांधिक धुळे शहरातील आहेत.

.

धुळे तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टच्या 92 अहवालांपैकी 5 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. खाजगी लॅबमधील 64 अहवालापैकी 27 अहवाल पॉझिटव्ह आले आहे. त्यात पारोळा रोड 1, शिवपार्वती कॉलनी 1, शाह नगर मालेगाव रोड 3, कृषी नगर साक्री रोड 1, भास्कर कॉलनी जमनागिरी रोड 1, आग्रा रोड 1, मालेगाव रोड 1, अग्रवाल नगर 1, भिडे बाग 1, अलंकार सोसायटी 1, कुमार नगर 1, जीटीपी स्टॉप 1, प्रोफेसर कॉलनी 1, देवपूर 1, रामकृष्ण नगर देवपूर 1, मयूर कॉलनी 1, ममता हॉस्पिटलच्या मागे 1, भावसार मंगल कार्यालयामागे 2, गल्ली नंबर 4 1, धांडरें 1, कुसुंबा 1, जामनेर 1, अमळनेर 1, सोयगाव औरंगाबाद येथील एकाचा समावेश आहे.

तसेच रॅपिड अँटीजन टेस्टच्या दोन अहवालांपैकी भिडे बाग 1 व गल्ली नंबर 4 मधील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्हाची एकूण रूग्ण संख्या 46 हजार 71 इतकी झाली आहे. आतापर्यंत एकुण 672 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com