गॅरेज चालकाची 29 लाखात फसवणूक; तिघांवर गुन्हा

Fraud
Fraud

धुळे । dhule प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील निजामपूर येथील गॅरेज चालकांची (garage operator) तब्बल 29 लाखात फसवणूक (fraud) केल्याप्रकरणी तिघांवर निजामपूर पोलिसात गुन्हा (crime) नोंद झाला आहे.

याबाबत गॅरेज चालक जुनेर अली फरूक अली सैय्यद (वय 36 रा.निजामपूर) याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, आरीब शब्बीर पिंजारी (रा.सोनगड), आसीफ आरीफ पिंजारी (रा.सोनगड जि.तापी) आणि मोहम्मद अली (रा.सेलाबा ता.सागबारा जि.नर्मदा) या तिघांनी संगतमत करीत जुनेर सैय्यदचा ट्रक (क्र.एमएच18-बीजी 9628) घेवून जात फायन्साय कंपनीचे काही हप्ते न भरता 29 लाख 6 हजार 520 रूपयांची फसवणूक केली.

हा प्रकार दि. 10 डिसेंबर 2021 ते दि. 9 फेब्रुवारी 2023 दरम्यान घडला. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात तिघांविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचा तपास पोसई काळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com