टँकरसह 29 लाखांचे बायोडिझेल जप्त

एलसीबीची कारवाई, चालकासह तिघांना अटक
टँकरसह 29 लाखांचे बायोडिझेल जप्त

धुळे । Dhule । प्रतिनिधी

मुंबई-आग्रा महामार्गावरील अवधान फाट्याजवळ (Avadhāna phāṭyā) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने सापळा रचुन (trap) टँकरसह (Tanker) 29 लाखांचे बायोडिझेल पकडले. (Caught biodiesel) काल रात्री ही कारवाई करण्यात आली. सुरतवरून मालेगावकडे त्यांची वाहतूक (Transportation) केली जात होती. याप्रकरणी टँकर चालकसह तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे.

डिझेलऐवजी बायोडिझेल नावाने इंन्डस्ट्रियल ऑईलचा वापर वाहनांमध्ये इंधन म्हणून बेकायदेशिरपणे केला जात असल्याने पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी कारवाई करण्याची सुचना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिली होती. तपास सुरू असतांना सुरूत येथून बायोडिझेल भरून टँकर मालेगावकडे जात असल्याची गुप्त माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर अवधान फाटा येथे सापळा लावला.

रात्री 9.15 वाजेच्या सुमारास जी.जे.05 ए.यु.9025 क्रमांकाच्या टँकरला पथकाने थांबविले. टँकर चालक जयप्रकाश विश्वकर्मा (रा.सुखीपूर आझमगड उत्तरप्रदेश), अल्तमश मिया इरफान मिया (रा.चिराग गल्ली, नंदुरबार) व मनोज भगवान माळी (रा.माळीवाडा, नंदुरबार) यांना टँकरमधील मालाच्या बिलाबाबत विचारपूस केली मात्र त्यांच्याकडे कोणत्याही स्वरुपाची बिले मिळून आली नाही. हजीरापोर्ट, गुजरात येथून मंगेश सिंधी व त्याचा भाऊ योगेश सिंधी, विजय माळी यांच्या सांगण्यावरुन बायोडिझेल भरण्यात आले. ते मालेगावला नेत असल्याचेही तिघांनी सांगितले.

टँकरमध्ये 19 लाख 25 हजार रुपये किंमतीचे 25 हजार लिटर बायोडिझेल आढळून आले. त्यासह 10 लाखांचा टँकर असा एकुण 29 लाख 25 हजार रूपये किंमतीचा मुद्येमाला जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांवर भादंवि 285, 177 आणि जीवनाश्यक वस्तु कायदा 1955 चे कलम 3 व 7 प्रमाणे मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी निरीक्षक शिवाजी बुधवंत, सपोनि प्रकाश पाटील उपनिरीक्षक योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, पोहेकॉ.श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदीप सरग, योगेश चव्हाण,मयुर पाटील, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, तुषार पारधी, महेंद्र सपकाळ यांच्या पथकाने ही केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com