कावठी येथे 2700 कोंबड्यांचा मृत्यू

साडेपाच लाखांचे नुकसान, गुन्हा दाखल
कावठी येथे 2700 कोंबड्यांचा मृत्यू
संग्रहीत छायाचित्र

सोनगीर Songir । । वार्ताहर

कावठी ता. धुळे येथील एका शेतकर्‍याच्या (Farmers) कोंबड्यासाठी (hens) साठविलेल्या पिण्याच्या पाण्यात (drinking water)अज्ञात व्यक्तीने विषारी द्रव्य (Toxic substance) टाकल्याने ते पाणी पिणार्‍या दोन हजार 700 कोंबड्यांचा मृत्यू (Death of hens) झाला. एका कोंबडीचे दोनशे रुपये प्रमाणे पाच लाख 40 हजाराचा फटका शेतकर्‍याला बसला आहे.

कावठी येथील संतोष भाईदास पाटील यांचे कावठी शिवारातील शेतात पोल्ट्रीफार्म आहे. शेतीला पुरक म्हणून तो व्यवसाय सुरू केला. पोल्ट्रीफार्म मध्ये 2700 कोंबड्या होत्या. कोंबड्यांना पाणी पिण्यासाठी एक टाकी असून त्यातील पाणी पसरट भांड्यात टाकले जाते. बुधवारी (ता. 24) सकाळी सर्व कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्याने शेतकरी पाटील यांना धक्काच बसला.

मंगळवारी (ता. 23) रात्री बारानंतर अज्ञाताने टाकी व भांड्यातील पाण्यात विषारी द्रव्य टाकल्याने कोंबड्या मयत झाल्याची संशय आहे. पाण्याला विशिष्ट वास येत होता. मेहरगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख यांनी पंचनामा करून कोंबड्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठवले.

याप्रकरणी संतोष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com