ट्रकसह 22 लाखांचे स्पिरीट जप्त, चालक ताब्यात

ट्रकसह 22 लाखांचे स्पिरीट जप्त, चालक ताब्यात

धुळे । Dhule प्रतिनिधी

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) पथकाने दहिवद शिवारात सापळा रचत (Setting a trap) ट्रकसह 22 लाखांचा (22 lakhs including truck) स्पिरीटसाठा (Seizure of spirits)जप्त केला. चालकालाही ताब्यात घेण्यात आले. काल मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील दहिवद (ता. शिरपूर) शिवारातील हॉटेल मा करणीकृपा जवळ ट्रकमधून (क्र. एमएच 48 सीबी 3746) अवैध मद्यार्क वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला काल मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे सापळा रचला. समोरून संशयित वाहन येत असल्याचे दिसताच त्याला थांबविण्याचा इशारा केला. चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला थांबविले.

वाहनाची तपासणी केली असता त्यात दोनशे लिटर क्षमतेचे एकूण 88 ड्रम पूर्णपणे स्पिरीटने भरलेले मिळून आले. एकूण ट्रकसह त्यातील 17 हजार 600 लिटर स्पिरीट जप्त करण्यात आले. त्यांची किंमत 22 लाख 82 हजार 500 रूपये इतकी आहे. याप्रकरणी वाहन चालक दीपक केशरी माटे (रा.हाउस नं.264,वार्ड नं 7 बिछुवा, छिंदवाडा,मध्य प्रदेश) व इतरांवर याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क शिरपूर विभागाचे निरीक्षक एस.एस.हांडे, निरीक्षक बापूसाहेब महाडीक, दुय्यक निरीक्षक सागर चव्हाण, एस.एस.आवटे, एस.एस.शिंदे, बी.एस.चोथवे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस.एस.गोवेकर, जवान गोरख पाटील, केतन जाधव, प्रशांत बोरसे, जितेंद्र फुलपागरे, अमोल धनगर, के.एम.गोसावी, मनोज धुळेकर, दारासिंग पावरा, वाहन चालक रवींद्र देसले, निलेश मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com