
धुळे । Dhule । प्रतिनिधी
महापौर निवडीसाठी (mayoral election) 19 जुलैला विशेष महासभा (special general meeting) घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी (Divisional Commissioners) दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश व शासकीय अभियोक्ता अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड यांच्या अभिप्रायानुसार राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने धुळे महापौरपद खुला (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी जाहीर केले आहे. त्यामुळे महापौर निवडीसाठी विभागीय आयुक्तांनी विशेष सभा घेण्याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यानुसार 19 जुलैला सकाळी 11 वाजता विशेष महासभा होणार आहे.
या विशेष सभेला विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी जलज शर्मा हे पिठासन अधिकारी म्हणून काम पाहतील. ही बैठक प्रत्यक्ष उपस्थितीने घेण्यात यावी, बैठकीची व्यवस्था नगरसचिवांनी पिठासन अधिकार्यांशी चर्चा करुन निश्चित करावी असे पत्रात नमुद केले आहे.
महापौर पदासाठी हालचालींना वेग आला आहे. महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे भाजपाचे नेते ज्यांचे नाव महापौर पदासाठी निश्चित करतील. त्यांची वर्णी महापौर पदासाठी लागेल.