17 तोळ्याचा सोन्याचा तुकडा घेवून मणी घडवीणारा गायब

सराफ व्यवसायिकाची धुळे शहर पोलिसात तक्रार
17 तोळ्याचा सोन्याचा तुकडा घेवून मणी घडवीणारा गायब

धुळे । प्रतिनिधी dhule

येथील सराफ व्यवसायिकाचा एकाने विश्वासघात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ज्वेलर्स दुकानातुन (Jewelers shop) 17 तोळ्याचा सोन्याचा तुकडा घेवून मणी घडविणारा मजुर गायब झाला आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

17 तोळ्याचा सोन्याचा तुकडा घेवून मणी घडवीणारा गायब
पत्नी आणि मुलीची हत्या करून स्वतः केली आत्महत्या

धुळ्यातील आग्रा रोडवरील (Agra Road) सराफ बाजारातील एस कांतीलाल ज्वेलर्स अ‍ॅण्ड कंपनीचे मयुर जितेंद्र शहा (वय 30) यांनी शहर पोलीसात (police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांनी दि.5 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दुकानातून 17 तोळे 2 ग्रॅमचा 10 लाख 98 हजार 328 रूपये किंमतीचा सोन्याचा तुकाडा अमिर रूद्दीन वाहिद मलिक (रा.315, शिवाजी नगर झोपडपट्टी, धुळे) यास मणी घडविण्यासाठी दिला होता. मात्र त्याने विश्‍वासघात करीत तो चोरीच्या उद्देशाने घेवून कुठेतरी निघून गेला. म्हणून त्याच्यावर गुन्हा नोंद झाला असून पोना बागुल तपास करीत आहेत.

17 तोळ्याचा सोन्याचा तुकडा घेवून मणी घडवीणारा गायब
धक्कादायक : साडे तीनशे बालकांच्या मृत्यूच्या कारणांची नोंद शासन दरबारी नाही
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com