धुळ्यातील रस्त्यांसाठी 13 कोटी मंजूर

आ. फारूख शाह यांचा पाठपुरावा, वडजाई रोड व साक्रीरोडचे नूतनीकरण होणार
धुळ्यातील रस्त्यांसाठी 13 कोटी मंजूर

धुळे Dhule । प्रतिनिधी

आ. फारुख शाह (MLA Farooq Shah) यांच्या प्रयत्नातून रस्त्यांसाठी (roads) 13 कोटींचा निधी मंजूर (3 crore sanctioned) केला आहे. या निधीतून वडजाई रोडसाठी 7 कोटी तर साक्री रोडसाठी 6 कोटी खर्च करण्यात येणार आहे.

शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वडजाई रोडची दुरावस्था झाली आहे. तो रस्ता नव्याने तयार करावा अशी मागणी नागरिकांनी केली. हा रस्ता ऐंशीफुटी रोडपासून वडजाई रोड ते थेट मुंबई आग्रा महामार्ग व जळगाव तसेच औरंगाबादकडे जाणार्‍या महामार्गावर जोडला जातो. नागरिकांना त्या रोड वरून जातांना लहान-मोठे खड्डे व अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. या आधी धुळे शहर विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांनी व माजी आमदारांनी या वडजाई रोडबाबत आश्वासने दिली होती.

परंतु कुणीही या रस्त्याची दखल घेतली नाही. त्याचप्रमाणे महिंदळे परिसरातील साक्रीरोड देखील शहरातील मुख्य रस्ता असून तो गुजरात राज्याला जोडणारा रस्ता आहे. त्याची देखील दुर्दशा झालेली आहे. येथे लहान - मोठे अपघात होत आहेत. याबाबतही तक्रारी आ. शाह यांच्याकडे प्राप्त झाल्याने येथे रस्ता दुभाजक टाकून या नवीन रस्ता तयार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.

2019 च्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत आ. फारूक शाह यांनी वडजाई रोड, साक्री रोड व यासारखे शहरातील विविध रस्ते डांबरीकरण करून नवीन करणार असल्याचे सांगितले होते. आ. फारूक शाह यांच्या विशेष प्रयत्नातून अर्थ संकल्पीय निधीतून वडजाई रोडसाठी 7 कोटी आणि साक्री रोडसाठी 6 कोटी मंजूर करुन आले आहेत.

या दोन्ही नविन रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. या दोन्ही रस्त्यांमुळे दळणवळण सुरळीत होणार आहे.

Related Stories

No stories found.