फटाक्यांच्या आतषबाजीत लक्ष्मीपूजन

फटाक्यांच्या आतषबाजीत लक्ष्मीपूजन

धुळे । Dhule । प्रतिनिधी

घरोघरातील अंगणात पेटलेल्या पणत्या (Ignited leaves)...झेंडूच्या फुलांनी दारांवर (marigold flowers)सजवलेले तोरणे....अंगणात काढण्यात आलेल्या आकर्षक रांगोळ्या (Rangoli)....फटाक्यांची आतषबाजी (Fireworks)....लक्ष्मींची आराधना अन् लज्जतदार जेवणाच्या संगतीने दीपोत्सव (Dipotsav) व लक्ष्मीपूजन (Lakshmipujan) कोरोना महामारीतही धुळेकरांनी साजरा (Celebrate) केला.

दीपोत्सवात सर्वात महत्वाचे लक्ष्मीपूजन असते. मांगल्य, आरोग्य धनसंपदा या सार्‍यांचे एकत्र रूप म्हणजे लक्ष्मीदेवता आणि याच कारणाने दीपोत्सवात लक्ष्मींची आराधना केली जाते. लक्ष्मी पूजनासाठी धुळेनगरी सजली होती. लक्ष्मीपूजन हे साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती. सराफ बाजारही आज फुलला होता.

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. त्यामुळे आज सराफ बाजार फुलला होता. लक्ष्मीची मूर्ती व इतर दागिणे खरेदी करण्यावर भर ग्राहकांनी दिला.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाहने खरेदी देखील केली जाते त्यामुळे शहरातील दुचाकी, चारचाकी वाहने विक्रीचे शोरूम सजली होती. ग्राहकांनाही वाहने खरेदीसाठी दीपोत्सवानिमित्त खास सवलत देण्यात आलेली होती. ग्राहकांनी अगोदरच वाहने बुक करून ठेवली होती. आज शुभमुहूर्तावर खरेदी केली. दुचाकी वाहनांची विक्रमी विक्री झाल्याचे सांगण्यात आले.

दीपावलीनिमित्त मित्र व आप्तस्वकीयांना शुभेच्छा देण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जातो. आधुनिक युगात मोबाईलद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या. त्यामुळे मोबाईल बिजी मिळत होते. अनेक कंपन्यांचे मोबाईल लाईन आज दिवसभर बिजीच होती.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापारी वही पूजन करतात. पारंपारीक पध्दतीने लक्ष्मींची आराधना करून पुरोहितांकडून वही पूजन आज करण्यात आले.

लक्ष्मी पुजनानिमित्त शहरात आज फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विविध बेरंगी फटाक्यांच्या आतषबाजीने धुळेनगरी न्हाऊन निघाली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com