Thursday, May 2, 2024
HomeनाशिकVideo : नैसर्गिक आपत्तीनं सारं हिरावून नेलं; कंबर कसली अन् उभारला 'हा'...

Video : नैसर्गिक आपत्तीनं सारं हिरावून नेलं; कंबर कसली अन् उभारला ‘हा’ व्यवसाय

नाशिक | Nashik

नाशिककडून (Nashik) वणीला (Vani) जातांना नांदुरी रस्त्यावर (Nanduri Road) नरेंद्र खांडे यांचा खांडे मळा (Khande Mala) आहे. या मळ्यात खांडे कुटुंबाची झेडूंच्या फुलांची शेती असून शेतीला (Agriculture) पूरक व्यवसाय त्यांनी सुरु केला आहे…

- Advertisement -

जगातील सर्वात मोठे विमान उतरले मुंबई विमानतळावर

दोन वर्ष नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural Disaster) खांडे कुटुंबाचे द्राक्षाच्या (Grapes) शेतीसह इतर पिकांचे (Crops) मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी खांडे कुटुंबाने नैसर्गिक आपत्तीच्या संकटात खचून न जाता शेतीला पूरक व्यवसाय म्हणून रसवंतीगृह सुरु केले. त्यावेळी त्यांच्या या व्यवसायाला मोठा प्रतिसाद मिळाला.

त्यानंतर खांडे कुटुंबाने हॉटेल व्यवसाय सुरु केला. सध्या त्यांचा हॉटेल व्यवसाय (Hotel Business) जोमात सुरु असून कुटुंबातील महिलाही व्यवसायाला हातभार लावत आहेत. तसेच हॉटेलमधील काही जेवण चुलीवर तर काही गॅसवर बनवले जाते. त्यामुळे पारंपारिक घरगुती जेवणाचा आस्वाद रस्त्याने ये-जा करणारे नागरिक घेत असतात.

तीन बसेसची जोरदार धडक; ३७ प्रवासी ठार

- Advertisment -

ताज्या बातम्या