खामखेडा सोसायटी चेअरमनपदी समाधान आहेर, व्हा-चेअरमनपदी दौलत बोरसे बिनविरोध

0
खामखेडा (वार्ताहर) | देवळा तालुक्यातील खामखेड़ा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी समाधान कडू  आहेर तर व्हा-चेअरमन पदी दौलत कांशीराम बोरसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

खामखेड़ा येथील विविध कार्यकारी  सेवा सोसायटीचे चेअरमन सुनील  शेवाळे व व्हा- चेअरमन भाऊसाहेब  सोनवणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झाल्येल्या चेअरमन व व्हा-चेअरमन जागेसाठी देवळा तालुक्याचे सहायक निर्बंधक अधिकारी संजय गीते यांनी देवळा येथील साहयक निर्बंधक कार्यलयात सर्व  संचालक मंडळाची बैठक बोलवण्यात येऊन चेअरमन व व्हा- चेअरमन पदासाठी  निवडणूक घेण्यात आली.

यावेळी चेअरमन पदासाठी समाधान  कडू आहेर  यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात येऊन .त्यास सूचक धनराज  शेवाळे तर अनुमोदक म्हणून अभिमान  शेवाळे होते.

तर व्हा- चेअरमनपदासाठी दौलत कांशिराम  बोरसे यांचा  एकमेव अर्ज दाखल दाखल करण्यात आला. याप्रसंगी सूचक म्हणून नानाजी मोरे तर अनुमोदक म्हणून हौशिराम मोरे यांनी दिले.

निर्धारित वेळेत चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज आल्याने चेअरमन म्हणून  समाधान कडू आहेर तर व्हा चेअरमन म्हणून दौलत कांशिराम बोरसे यांची निवडणूक अधिकारी  देवळ्याचे  सहाय्यक निबंधक संजय गिते यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

त्यांची निवड होताच कार्यकर्त्यांना फटाके फोडून आनंद व्यक्त केला. निवडणूक अधिकारी म्हणून निवडणूक अधिकारी म्हणून देवळ्याचे सहाय्यक निबंधक संजय गिते यांनी काम पाहिले.  तर त्यांना सहधिकारी एस ए देवघरे यांनी मदत केली.

यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व  व्हा. चेअरमन यांचा संचालक मंडळाच्यावतीने  सत्कार करण्यात आला. यावेळी वसाकाचे माजी संचालक अण्णा पाटील, सोसायटीचे  माजी चेअरमन  सुनिल शेवाळे, नानाजी मोरे, विश्वास शेवाळे, भाऊसाहेब शेवाळे, दौलत बोरसे, अरुण शेवाळे, भाऊसाहेब सोनवणे, हौशिराम मोरे, अभिमन शेवाळे, शेवाळे, उषा बोरसे, समाधान आहेर, उपसरपंच बापू शेवाळे,

माजी  शांताराम शेवाळे, दादाजी बोरसे, रमेश शेवाळे, शिवाजी बोरसे, भिका शेवाळे, मधुकर बोरसे, बारकू मोरे, भास्कर वाघ, बळीराम शेवाळे, गोरख शेवाळे, संजय मोरे, सचिन मोरे, संजय बच्छाव, गोकुळ मोरे, नामदेव बच्छाव, बाळू मोरे, खंडु शेवाळे, त्र्यंबक बोरसे, प्रशांत शेवाळे, अरुण शेवाळे, कारभारी शेवाळे, भाऊसाहेब देवरे, सचिन शेवाळे, गणेश मोरे, राकेश बच्छाव आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

*