Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

खामखेडा : अस्थिविसर्जन परंपरेला फाटा देत केले वृक्षारोपण

Share

वैभव पवार। खामखेडा : व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार केल्यावर त्यांची रक्षा नदीत न टाकता स्मशान किंवा शेतात त्या व्यक्तीच्या नावाने एक झाड लावून त्यांचे संगोपन करण्याचा खामखेडा येथील ग्रामस्थांनी एक मुखी निर्णय घेऊन या नव्या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

खामखेडा येथे आता नव्याने अवगत स्मशान भूमीचे बांधकाम करण्यात आले आहे. तेव्हा खामखेडा येथील ग.भा. विठाबाई मुरलीधर शेवाळे यांचे निधन झाल्याने त्यांच्यावर नाव्याने बांधण्यात आलेल्या स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला.

त्यावेळी रक्षा विसर्जन नदीपात्रात न करता शेतांत किंवा गावात स्मशान भूमीत खड्डा करून रक्षा विसर्जन करून त्या व्यक्तीच्या नावाने एक झाड लावून त्या कुटुंबाने त्यांचे संगोपन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात कै विठाबाई शेवाळे यांचा मुलगा शिवाजी शेवाळे यांनी आईच्या नावाने चिंचेचे झाड लावण्यात आले. बाहेर गावाहून रक्षा विसर्जित करण्यासाठी आलेले पाहून हा एक चांगला उपक्रम असल्याचे भावना पाहुण्याकडून ऐकावयास मिळाल्या.

नदीपात्रामध्ये अंत्यसंस्कार केल्यानंतर राहिलेली रक्षा नदी पात्रात न टाकता व्यक्तीच्या नावाने एक झाड लावल्यास वृक्ष लागवड करून पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होणार आहे. त्याची अंमलबजावनी शेवाळे कुटूंबियाकडून करण्यात आली. या[ यापुढे हा उपक्रम गावागावात राबविण्यात येईल.
-आण्णा पाटील ( माजी वसाका संचालक )

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!