चांदवडमध्ये उन्हाळ कांद्याला १९५१ रुपये विक्रमी भाव

0
चांदवड कृषि उत्पन्न बाजार समितीचे आवारावर बुधवार (दि.02) रोजी कांदा शेतीमालाची 14,000/- क्विंटलची आवक होवून बाजारभाव रु. 1951/- पर्यंत मिळालेले आहेत.

तसेच सरासरी रु. 1700/- प्रति क्विंटल प्रमाणे कांद्यास बाजारभाव मिळाले आहेत. देशातंर्गत व परदेशात महाराष्ट्रातील कांद्यांस मागणी वाढल्याने कांदा बाजारभावात वाढ झालेली आहे.

बाजारभावात सुधारणा झाली असली तरी बाजार समितीचे आवारावरील शेतीमालाची आवक स्थिर आहे. मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदा बेभावात विक्री करत असलेल्या शेतक-यांना कांद्यातील बाजारभाव वाढल्याने मोठ्याप्रमाणात दिलासा मिळाला आहे.

कांदा बाजारभावात माहे जुलै 2017 च्या शेवटच्या हप्त्यापासुन दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. तसेच आगामी काळात कांद्याच्या दरात अधिक सुधारणा होण्याचे संकेत जाणकरांनी दिले आहेत.

चांदवड बाजार समितीचे आवारावर विक्री झालेल्या सर्व शेतीमालाचे चोख वजनमाप करुन माल विक्रीची रक्कम तात्काळ रोख स्वरुपात अदा केली जाते. तरी शेतकरी बांधवांनी आपला शेतीमाल प्रतवारी करुन मोठ्याप्रमाणात चांदवड बाजार समितीत विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे, उपसभापती श्री. नितीन आहेर, सचिव (प्र.) गोरक्षनाथ गांगुर्डे आणि सर्व संचालक मंडळाने केले आहे.

LEAVE A REPLY

*