तलवारबाजीत केतनला सुवर्ण पदक

0
नाशिक । भारतीय तलवारबाजी महासंघाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन व नाशिक जिल्हा फेन्सिंग असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित दुसरी चाइल्ड राष्ट्रीय स्पर्धा पार पडली. स्पर्धेत 10 वर्षा आतील गटात महाराष्ट्राच्या केतन खैरनारने सुवर्ण तर अध्या आहेरने रौप्य पदक पटकावले.

स्पर्धेत मुलांच्या गटात शंतनू कटारेने रौप्य तर अगम्य बन्सलने कास्य पदक पटकावले. मुलींमध्ये अमी सुरी सुवर्ण, अध्या आहेर रौप्य, वैष्णवी चंद्रने व सुलेखा कुमारीने कास्य पदक पटकावले. भारतीय तलवारबाजी महासंघाचे खजिनदार अशोक दुधारे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून फेन्सिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे सहसचिव डॉ. उदय डोंगरे, कार्यकारणी सदस्य भरत ठाकूर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आनंद खरे उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी दीपक निकम, मनिषा काठे, राजू जाधव, राहुल फडोळ, अर्चना जाधव, चारुलता सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*