गायक ए. आर. रेहमानकडून केरळ पूरग्रस्तांसाठी १ कोटीची मदत

0
मुंबई : केरळमध्ये महापुरानं थैमान घाल्यानंतर तिथे अनेक जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा निर्माण झाला आहे. केरळमधील नागरिकांना मदत करण्यासाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. यात बॉलिवूडचे कलाकारही मागे नाहीत. अमिताभ बच्चन, सनी लिओनी यांच्यानंतर आता ऑस्कर विजेता संगीतकार ए. आर. रेहमान यांनंही पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. रेहमाननं केरळला १ कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे.

केरळमधील पूरग्रस्तांना मदत करता यावी म्हणून रेहमान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अमेरिकेत एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यातून मिळालेला निधी रेहमान पूरग्रस्तांना देणार आहे. कार्यक्रम संपल्यानंतर रेहमाननं ही घोषणा केली.

LEAVE A REPLY

*