केर्हाळे खुर्द येथे दोन महिलांचा निघुर्ण खुन
Share

केर्हाळे खुर्द ता. रावेर-
केर्हाळे खुर्द ता.रावेर येथे दोन महिलांचा निघुर्ण खुन झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ११वाजता घडली याबाबत रावेर पोलिस घटनस्थळी पोहचले असून तपास करत आहे. खून झालेल्या महीलामध्ये नसिबा रुबाब तडवी (वय ४८), शालूबाई गौतम तायडे (वय ४५) अशी त्यांची नावे आहे.घटना स्थळी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, निलेश चौधरी, विकास पहुरकर, भागवत धांडे, मनोज मस्के, अजय खंडेराव, व कर्मचारी घटना स्थळी हजर झाले आहे. सदरील घटना रा
वेर शिवारातील नारायण पाटील यांच्या कपाशी शेतात व विठ्ठल सोनवणे यांच्या शेतात घडली आहे.
घटना स्थळीं कपाशीचे गाठोडे सदरील महिला शेतात कपाशी वेचण्या करत असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसत आहे.त्यांच्या जवळ कपाशी वेचून साचलेल्या कपाशीचे गाठोडे सुद्धा मिळून आले आहे. सदरील महिला काल दुपार पासून बेपत्ता होत्या,याबाबत रावेर पोलिसात मिसिंग नोंद करण्यात आली आहे.