Type to search

देश विदेश मुख्य बातम्या

३६ वर्षाच्या महिलेचा ९ वर्षीय पुतण्यावर बलात्कार

Share
केरळ : एका ३६ वर्षाच्या महिलेवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. नऊ वर्षाच्या मुलावर या महिलेने बलात्कार केल्याचे हे धक्कादायक प्रकरण आहे. केरळमध्ये ही घटना घडली असून थेन्हीप्पलम पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पीडित मुलाने मागच्या आठवडयात सर्वप्रथम स्थानिक दवाखान्यातील डॉक्टरकडे याबद्दल वाच्यता केली.

डॉक्टरनं या घटनेबाबत चाइल्डलाइन संस्थेला माहिती दिली. त्यांनी मुलाचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांत तक्रार दिली. ‘पीडित मुलाचं एका वर्षाहून अधिक काळ लैंगिक शोषण करण्यात आलं. या प्रकारामुळं मुलाच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला आहे. आरोपी महिला ही त्याची काकी असून, त्याच्या शेजारीच राहते, अशी माहिती चाइल्डलाइनचे (मलप्पुरम) समन्वयक के. अन्वर यांनी दिली.

चाइल्डलाइननं दिलेल्या तक्रारीनंतर आम्ही महिलेविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पीडित मुलाचे कुटुंबीय आणि आरोपी महिलेच्या कुटुंबामध्ये वाद होता. या वादातून हा आरोप करण्यात आला आहे का, याचा तपास आम्ही करत आहोत. या प्रकरणी लवकरच आरोपी महिलेचा जबाब नोंदवून घेऊ, असं पोलीस उपनिरीक्षक बीनू थॉमस यांनी सांगितलं.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!