केरळ पूरग्रस्तांसाठी पेटीएमची ‘निधीसंकलन’द्वारे मदत

0

केरळ : केरळमध्ये बचावकार्य चांगल्या पद्धतीने चालू असून गुगलप्रमाणे पेटीएमनेही यात सहभाग घेत मदतकार्यात उत्साह वाढविला आहे.

पेटीएम ने आपल्या ट्विटर पेज वरून लोकांना मदतीसाठी आवाहन करत दोन दिवसात केरळच्या पूरग्रस्तांसाठी तब्बल 3 कोटी रुपयांचा निधी गोळा केला आहे. हा निधी थेट केरळच्या मुख्यमंत्री निधीत जमा होऊन तो पूरग्रस्तांसाठी वापरण्यात येणार आहे.

शतकातील सर्वात विनाशकारी पूर केरळ मध्ये आलेला असताना पेटीएम ने ‘केरळफ्लड’ नावाचा हॅशटॅग तयार करून तो लोकांपर्यंत पोहचविला आहे. केंद्र सरकारने देखील ५०० कोटींचा निधी केरळ पूरग्रस्तांसाठी दिला आहे.

LEAVE A REPLY

*