केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावला अक्षय कुमार

0

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून केरळ मध्ये पावसाने हाहाकार केला आहे. पूरग्रस्त परिस्थितीमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले. केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देशातील अनेक जण सरसावले आहे. यामध्ये बॉलिवूड कलाकार देखील सहभागी झाले आहे. अलीकडेच अभिनेता जॉन अब्राहम ने देखील केरळ पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यापाठोपाठ आता बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार देखील केरळ वासियांच्या मदतीला धावला आहे.

सामाजिक घटना असो वा नैसर्गिक संकट मदतीसाठी नेहमीच तत्पर असलेला बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार केरळवासीयांच्या मदतीला धावला आहे. अक्षय आणि चित्रपट निर्माता प्रियदर्शन यांनी नुकताच केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ठरावीक रकमेचा धनादेश केरळच्या मुख्यमंत्र्यांना दिला.

प्रियदर्शन यांनी शनिवारी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना मदतीचा धनादेश देतानाच फोटो सोशल साईटवर पोस्ट केला. तसेच केरळवासियांच्या मदतीसाठी सगळ्यांनी एकजूट होऊन मदत करावी असे आवाहन त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये केले आहे. ”मी आणि अक्षयने केरळच्या मुख्यमंत्री मदत निधीसाठी दान केले आहे. चला एकजूट होऊन केरळला पुन्हा उभे करुया. यात कुठलही राजकारण नाही, धर्म नाही तर फक्त माणुसकी आहे” असे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*