महापुरानंतर देवभूमीत आता ‘लेप्टोपायरॅसिस’चा धोका

0

तिरूअनंतपुरम : महापुराने थैमान घातलेल्या केरळात आता एका रोगाने थैमान घातले असून यात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर रॅट फिवर नावाचा संक्रमणजन्य आजारामुळे आता तेथे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. १०० पेक्षा अधिक लोक या रोगाची शिकार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

येथील आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जवळपास २०० लोकांना या आजाराची लागण झाली आहे. पुरानंतर झालेल्या दुषीत पाण्यामुळे या आजाराची लागण होत आहे. या आजाराला लेप्टोस्पायरोसिस असे देखील म्हणतात. अंगदुखी, ताप येणे अशी या आजाराची लक्षणं आहेत. केरळमध्ये आलेल्या महापुरानंतर अस्वच्छतेमुळे हा आजार पसरला आहे.

त्यामुळे ठिकठिकाणी यावर प्रथमोपचार म्हणून प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप सुरु केले आहे. महापुरानंतर लेप्टोस्पायरोसिस तसेच टायफॉईड आणि कॉलरा सारख्या आजारांचा इशारा देखील देण्यात आला होता.

LEAVE A REPLY

*