केडगाव दुहेरी हत्याकांड : पोलिसांचेच पॉलिटिक्स

0
रिपाइंच्या अशोक गायकवाड यांचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी) – केडगाव दुहेरी हत्याकांड हे दुर्दैवी आणि हृदयद्रावक आहे. राजकीय लोक राजकारण करत असतात. मात्र, या प्रकरणात पोलीसांचे राजकीय दबावाखाली राजकारण सुरू आहे. केडगाव हत्याकांडप्रकरणी आरोपींना जेरबंद केले ही कौतुकाची बाब असली तरी या हत्याकांडात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा सहभाग आहे की नाही, याचा खुलासा पोलीसांनी सामान्य जनतेला जाहीरपणे करावा, असे आवाहन रिपाईंचे नेते अशोक गायकवाड पोलिसांना दिले.

नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होते. केडगाव हत्याकांडप्रकरणी पोलीसांनी राजकीय दबावाला बळी न पडता मतदार यादीसारखी निरपराध तरूणांची आणि कार्यकर्त्यांची यादी तयार करून त्यांची धरपकड थांबवी. तसेच या हत्याकांड खर्‍याअर्थाने दोषी आढळणार्‍यावर कठोर कारवाई करावी. केडगाव दुहेरी हत्याकांड आणि त्यानंतर पोलीसांनी केलेल्या कारवाईमुळे शहराची ओळख ‘गुन्हेगारांचे शहर’ अशी झाली आहे. त्यातच आता पोलीसांनी निरपराधी लोकांना तुरूंगात डांबून ठेवून त्यांच्यावर अन्याय करून नये. हत्याकांडानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयावर 300 लोकांच्या जमावाने हल्ला केल्याची माहिती वृत्तपत्रातून वाचली. वास्तवात 300 आक्रमक लोकांच्या हल्ल्यात पोलीस अधीक्षक कार्यालयातील दोनच काचा कशा फुटला याचा शोध घेणे आवश्यक आहे.

या हल्ल्यात आणखी कशाचे नुकसान झाले याचा खुलासा पोलीसांकडून करण्यात आलेला नाही. यामुळे हल्ल्याविषय आणि पोलीसांच्या भूमिकेविषय प्रश्‍नचिन्ह असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. पोलीसांकडून या हल्ल्याला रंगविण्यात आला असल्याचा आरोपी त्यांनी यावेळी केला. तसेच केडगाव हत्याकांडात मुत्यूमुखी पडलेल्या कोतकर आणि ठुबे यांच्या कुटूंबियांना आधार देणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली.

गिरवले पोलीस यंत्रणेचा बळी
नगरसेवक कैलास गिरवले यांच्या मृत्यू दूर्दैवी आहे. रिपाईंच्यावतीने त्यांना श्रध्दाजली वाहत गिरवले यांचा मृत्यू हा पोलीस यंत्रणेचा बळी आहे. याप्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशीची मागणी गायकवाड यांनी यावेळी केली.

केडगाव मर्डर राजकीय की व्यक्तीगत हेतूने
या हत्याकांडप्रकरणी पकडण्यात आलेल्या गुन्हेगारांनी आतापर्यंत एकाही राजकीय व्यक्तीचे नाव घेतलेले नाही. यामुळे केडगाव हत्याकांड राजकीय कारणावरून की व्यक्तिगत करणावरून झाला याचा खुलासा होणे आवश्यक आहे.

 

LEAVE A REPLY

*