Type to search

Featured सार्वमत

नगर: केडगावच्या कराळेची पोलिसाला दमबाजी

Share

मुलाची अटक टाळण्यासाठी शिवीगाळ करत तक्रारीची धमकी

अहमदनगर (प्रतिनिधी) – तडीपारीची कारवाई झालेल्या केडगावच्या कराळेचे पाय आणखी खोलात गेले आहेत. मुलगा मनोज कराळेची अटक टाळण्यासाठी पोलिसाला दमबाजी करण्यात आल्याप्रकरणी पोलिसांत भाऊसाहेब कराळे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

भाऊसाहेब कराळे असे गुन्ह्यातील आरोपीचे नाव असून पोलीस हवालदार प्रभाकर भांबरकर यांनी फिर्याद दिली आहे. भांबरकर हे केडगाव पोलीस चौकीत शासकीय काम करत असताना भाऊसाहेब कराळे याने मुलगा मनोज याला अटक करून नये यासाठी वेळोवेळी फोन केला. अटक केल्यास तुझी आयजी आणि एसपींकडे तक्रार करेल अशी धमकी देत भांबरकर आणि त्यांच्या पत्नीला अश्‍लील भाषेत शिवीगाळ केली असल्याचे भांबरकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. मनोज कराळे याच्यावर 324, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल असून त्याचा तपास भांबरकर यांच्याकडे आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!