पोलीस अधीक्षक कार्यालयात तोडफोड : आ.कर्डिले, कळमकर, गिवरले, जगताप यांच्यावर गुन्हा : 22 जण अटकेत

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – केडगाव हत्याकांड प्रकरणानंतर शनिवारी रात्री जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात धूडगुस घालून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, सचिन जगताप, कैलास गिरवले, कुमार वाकळे, निखील वारे यांच्यासह 250 ते 300 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 22 जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी शनिवारी रात्री केडगाव येथील दोन शिवसैनिकांच्या हत्याप्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप आणि आ.संग्राम जगताप यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या जमावाने पोलिस अधीक्षक कार्यालयात धूडगुस घातला. प्रचंड तोडफोड केली.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, 7 रोजी रात्री आ.जगताप यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी आणले होते. यावरून आ.शिवाजी कर्डिले, दादाभाऊ कळमकर, कैलास गिरवले, सचिन जगताप, अभिषेक कळमकर, अभिजीत खोसे, कुमार वाकळे, निखील वारे, बाबासाहेब गाडाळकर यांच्यासह 250 ते 300 जणांच्या जमावाने आ.संग्राम जगताप यांना सोडून द्या, असे म्हणत पोलीस अधीक्षक कार्यालयावर दगडफेक केली. कार्यालयाचे दरवाजे लाकडी दांडक्याने तोडले. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. पोलीस अधीक्षक कार्यालयात अनधिकृत प्रवेश केला व बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. पोलीस नाईक संदीप घोडके यांना मारहाण केली.
यावरून घोडके यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आ.कर्डिले, कळमकर, जगताप यांच्यासह 250 ते 300 जणांवर भादवि कलम 353, 333, 143, 147, 148, 149, 452, 427, 323, 504 सह सार्वजनिक विद्रुपीकरण कलम 3, 7 सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा कलम 3 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 22 जणांना अटक करण्यात आली आहे. अन्य फरार आहेत.

LEAVE A REPLY

*