केडगाव दुहेरी हत्याकांड : अप्पर पोलीस महासंचालक बिपीन बिहारी नगरमध्ये

0
अहमदनगर: शनिवारी सायंकाळी केडगाव मध्ये शिवसेना पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. त्यांनतर तणाव निर्माण झाला होता. या पार्शवभूमीवर अप्पर पोलीस महासंचालक बिपीन बिहारी नगरमध्ये पोहोचले आहे. त्यांनी आज सकाळी पोलीस अधिक्षक कार्यालयाची पाहणी केली आहे. तसेच या घटनेबाबत पोलीस अधिक्षक शर्मा यांच्याकडून सविस्तर माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान आज या हत्याकांडामुळे शिवसेनेच्या वतीने जिल्हा बंदीची हाक देण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्‍यातील शिवसेनेच्या शाखांच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाभर तणावसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. केडगाव शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी श्रीगोंद्यात कडकडीत बंद; चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच अकोले, जामखेड, येथे देखील कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.

अहमदनगरमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिर्डी दौरा रद्द झाला आहे.नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे नगरमध्ये पोहोचले असून. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

LEAVE A REPLY

*