केडगाव दुहेरी हत्याकांड: तोडफोड प्रकरणातील आरोपींची नावे

0
सार्वमत ऑनलाईन
अहमदनगर (प्रतिनिधी) – केडगाव येथे शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या झालेल्या निर्घृण हत्येनंतर रविवारी सकाळपासून नगरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात धुडगुस घालून तोडफोड केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपीना आज दुपारी कोर्टात हजर करण्यात आले आहे. शहरात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच घटनेची गंभीरता लक्षात घेत कोर्टात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यामध्ये, आमदार संग्राम अरुण जगताप, आमदार अरुण बलभीम जगताप, आमदार शिवाजी कर्डिले, भानूदास एकनाथ कोतकर, संदीप भानूदास कोतकर, विशाल बाळासाहेब कोतकर, औदुंबर बाळासाहेब कोतकर, बाळासाहेब एकनाथ कोतकर, रवि खोल्लम, अशोक मोहन कराळे, नवनाथ मोहन कराळे, मोसीन शेख, विजय एकनाथ कराळे, रमेश तात्याभाऊ कोतकर, शरद रामचंद्र जाधव, संदीप बाळासाहेब गिऱ्हे, दादा बन्शी येणारे, विनोद लगड, मनोज भाऊ कराळे, भानूदास कोतकर उर्फ बीएम, मयूर राऊत, वैभव वाघ, शरद लगड, स्वप्नील पोपट पवार, संकेत शरद लगड, बाबासाहेब बापू केतकर, राजू गांगड, आप्पा दिघे, बाबूराव रामभाऊ कराळे, ज्ञानेश्वर यादव कराळे आदींची नावांची यादी पोलिसांकडून जाहीर करण्यात आली आहे.
या घटनेत संग्राम जगताप यांच्या अटकेच्या निषेधार्थ शनिवारी रात्रीच्या सुमारास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये येऊन धुमाकूळ घातला होता. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करत कार्यालयाची तोडफोड केली होती. या प्रकरणात पोलिसांनी २२ जणांना  अटक केली आहे.

यामध्ये कैलाश रामभाऊ गिरवले, शरिफ राजू शेख, राहुल अरूण चिंतामण, प्रसन्न मनोहर जोशी, सय्यद अशिंद अकबर, आवेश जब्बार शेख, सय्यद जाएद असिफ, सागर मच्छिंद्र वाव्हळ, संजय मधुकर वाल्हेकर, अनिल रमेश राऊत, अनिकेत बाळासाहेब चव्हाण, गिरीष सुभाषराव गायकवाड, दीपक रामचंद्र गाडीलकर, रियाज रमजान तांबोळी, दत्ता सखाराम उगले, कुणाल सुभाष घोलप, साईनाथ यादव लोखंडे, सचिन रामदास गवळी, सोमनाथ भाऊसाहेब गाडेकर, संतोष लहानू सूर्यवंशी, धर्मा त्रिंबक करांडे, इम्रान जानसाहेब शेख आदींना अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*