केडगाव दगडफेक प्रकरणी शिवसैनिक स्वतःहून पोलिसांना शरण

0
सार्वमत ऑनलाईन :
अहमदनगर : केडगाव दगडफेक प्रकरणातील गुन्ह्यात शिवसेनेचे शहर प्रमुख तथा नगरसेवक दिलीप सातपुते, नगरसेवक विक्रम राठोड, युवा सेनेचे शहराध्यक्ष हर्षवर्धन कोतकर यांच्यासह १६ शिवसैनिक कोतवाली पोलिसांना शरण आले आहे.

काही दिवसापूर्वी केडगाव येथे दोन शिवसैनिकांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांनतर केडगाव परिसरात हिंसाचार उफाळला होता. यावेळी संतप्त शिवसैनिकांकडून रस्ता रोको करण्यात आला होता. तसेच परिसरातील वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी जवळपास सहाशे शिवसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. गुन्हे दाखल करण्यात आलेला असताना देखील पोलिसांकडून शिवसैनिकांना अभय देण्यात असल्याचे आरोप सुरु झाले. शिवसेना व पोलिसांमध्ये काहीतरी डाळ शिजतेय अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. परंतु आज १६ शिवसैनिक सस्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले आहे.

LEAVE A REPLY

*