‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स!

0
मुंबई-  साऊथ स्टार सत्यराज संपूर्ण देशात केवळ एका भूमिकेमुळे लोकप्रिय झालेत. ही भूमिका होती, कटप्पाची. कटप्पाची भूमिका साकारणार्‍या याच सत्यराज यांच्यासोबत ऐश्वर्या राय बच्चन ऑनस्क्रिन रोमान्स करताना दिसणार आहे. मणिरत्नम यांच्या पोन्निनी सेल्वमम या आगामी चित्रपटात सत्यराज यांची एन्ट्री झाली आहे. या सिनेमात ऐश्वर्या राय लीड रोलमध्ये असल्याचे कळतेय आणि ऐश्वर्याच्या पतीची भूमिका सत्यराज साकारणार, अशी चर्चा आहे. या सिनेमात ऐश्वर्या एका राजकुमारीच्या भूमिकेत झळकणार आहे. एका राजासोबत तिचे लग्न होते. पण राजकुमारी या लग्नाचा वापर केवळ आपल्या इच्छापूर्तींसाठी करते. एका तामिळ कादंबरीवर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. चर्चेनुसार, मणिरत्नम दिग्दर्शित पोन्निनी सेल्वमममध्ये ऐश्वर्यासोबत तिचे सासरे अमिताभ बच्चन हेही दिसू शकतात.

अर्थात अद्याप अमिताभ आपल्या बिझी शेड्यूलमुळे या चित्रपटाला होकार देऊ शकलेले नाहीत.पोन्निनी सेल्वमममध्ये ऐश्वर्याच्या पतीची भूमिका आधी अभिनेते मोहनबाबू साकारणार अशी चर्चा होती. त्यांनी या चित्रपटासाठी होकार दिल्याचेही म्हटले गेले होते. पण आता कदाचित त्यांच्याजागी सत्यराज यांची वर्णी लागली आहे. साहजिकच कटप्पा व ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स कसा रंगतो, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

LEAVE A REPLY

*