Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

नगर: कत्तलच्या रात्रीच्या मिरवणुकीतील टारगटांवर पोलिसांचा लाठी चार्ज

Share

अहमदनगर (प्रतिनिधी)- मोहरममध्ये महत्वपूर्ण समजली जाणारी कत्तलच्या रात्रीच्या मिरवणुकीला गालबोट लागले. मिरवणूकीतील टारगटांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला. त्यामुळे कोठला परिसरात तणावाचे वातावरण होते. छोटे इमाम यांची सवारी कोठला येथून बाहेर पडली होती. काही टारगट परिसरात उच्छाद घालत होते. पळापळी करत होते. यामुळे उपस्थित असलेल्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. उच्छाद घातलेल्या टारगटांना रोखण्यासाठी पोलीस पुढे सरसावले. यावेळी पोलिसांच्या अंगावर धावून आले.

पोलीस उपधीक्षक राकेश मानगावकर हे त्यावेळी पुढे होते. त्यावेळी टारगटांचा एक गट त्यांच्या अंगावर धावुन आला. त्याचवेळेस उपअधीक्षक माणगावकर यांच्याबरोबर असलेल्या पोलिसांनी टारगटांना रोखले. त्याचवेळी टारगटांना पोलिसांवर हल्ला केला. हा टारगटांचा हल्ला रोखण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज केला. पोलिसांच्या लाठी चार्जमुळे कोठला परिसरात चांगलीच पळापळ झाली. पोलिसांवर हल्ला करणार्‍या टारगटांला ताब्यात घेतले. कोठला समितीने पोलिसांच्या लाठी चार्जवर नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी दडपशाही केल्याचा आरोप यावेळी पदाधिकार्‍यांनी केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!