कठुआ व उन्नाव बलात्कार प्रकरण : बॉलिवूड कलाकार उतरले रस्त्यावर

0
मुंबई : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या कठुआ व उन्नाव बलात्कार प्रकरणांविरोधात सगळीकडे जनमानसात संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियापासून ते सर्वत्र या घटनांचा जाहीर निषेध केला जातो आहे. रविवारी मुंबईतील जनता या प्रकरणांतील बलात्कार पीडितांना न्याय देण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरली. या गर्दीत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी देखील सहभाग घेतला होता.

कठुआ येथे आठ वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्कारामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. या घटनेतील पीडितेला न्याय मिळावा यासाठी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरू लागले आहे. बलात्कार पीडितांना न्याय आणि आरोपींना कठोरातील कठोर शिक्षेची मागणी करत, मुंबईकर वांद्रे भागात एकवटले होते. यामध्ये बॉलिवूड मधील कलाकार देखील सहभागी झाले होते. या घटनेचा कलाकारांनी देखील निषेध केला.

यावेळी आमिर खानची पत्नी किरण राव, सलमान खानची आई हेलेन, अभिनेता राजकुमार राव, त्याची प्रेयसी व अभिनेत्री पत्रलेखा, अदिती राव हैदरी, सोना महोपात्रा, कल्की कोच्लिन, संगीतकार विशाल डडलानी आदी सेलिब्रिटींनी या घटनेचा निषेध नोंदवला. विशाल डडलानी याने बलात्कार्यांना फासावर चढवण्याची मागणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

*