Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

स्वातंत्र्यदिनी कुटुंबासह धरणात जलसमाधीचा काश्यपी धरणग्रस्तांचा इशारा

Share

नाशिक । प्रतिनिधी

काश्यपी धरणग्रस्त शेतकरी २२ वषार्पासुन नोकरी व पुर्नवसनाची वाट पाहत असून शासनाने त्या न दिल्यामुळे काश्यपी धरणग्रस्तांनी १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिनी कुटुंब व गुराढोरांसह धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी,  प्रकल्पाविषयी स्थानिकांना विश्वासात न घेता आमच्या जमिनी संपादीत करण्यात आल्या आहेत. आमच्या अशिक्षितपणाचा फायदा उचलला आहे.

त्यामुळे पुढील १५ दिवसात या प्रकरणाची सखोल चौकशी करुन धरणग्रस्तांना न्याय द्यावा. कश्यपी धरण प्रकल्पासंबंधीच्या कराराप्रमाणे बाधीत कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी मिळावी,

संपादित जमिनींचा मोबदला आजच्या बाजार भावाप्रमाणे तात्काळ देण्यात यावा, पुर्नवसना संबंधी चालवलेली कुचेष्ठा थांबवुन न्याय हक्काप्रमाणे पुर्नवसन करावे, स्थानिकांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी साठा आरक्षित करुन पाणी वापरांसंबंधी स्थानिकांना विश्वासात घ्यावे.

जलसमाधी घेताना पोलीस बळाचा वापर झाल्यास धरणग्रस्त प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती आत्मदहन करेल व त्याची सर्व जबाबदारी शासनाची असेल असा इशारा दिला आहे . निवेदनावर सोमनाथ मोंढे, एकनाथ बेंडकोळी, भगवंत खाडे, मीनानाथ बेंडकोळी, नारायण मोंढे, भास्कर गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!