Wednesday, April 24, 2024
Homeनगरकाष्टीत दुसर्‍या दिवशीही खिसे कापले, एका महिलेला पकडले

काष्टीत दुसर्‍या दिवशीही खिसे कापले, एका महिलेला पकडले

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे शुक्रवारी एक पिक वाहनातून अडीच लाखांची रोकड लांबविली असताना शनिवारी काष्टीच्या बाजारात पुन्हा खिसेकापूंनी हाथ साफ केला. यात एकाचे 50 हजार रुपये तर दुसर्‍या व्यक्तीचे 10 हजार रुपये खिसा कापून पळून जाताना कर्नाटक मधील महिलेला काष्टीच्या बाजारात पकडले आणि पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

काष्टी येथे बैल बाजारात म्हशी, गाय, बैल, शेळ्या विक्री मधून मोठी आर्थिक उलाढाल होते. या ठिकाणी राज्याच्या विविध भागांतून शनिवारी जनावरे खरेदी विक्रीसाठी मोठी गर्दी होत असते. याचाच फायदा घेऊन भुरटे चोर हात सफाई करत असताना शनिवारी देखील अशाच प्रकारे दाणेवाडी येथील अनिल गव्हाणे हे तीन म्हशी घेऊन बाजारात आले होते.

- Advertisement -

म्हशी विक्री नंतर ते बारा वाजण्याच्या सुमारास उर्वरीत रक्कम घेण्यासाठी बाजारात आले असताना गर्दीच्या ठिकाणी त्यांच्या खिशात असलेले 50 हजार रुपये एक महिला काढत असताना त्यांना दिसली. मात्र गर्दी असल्याचा फायदा घेत ही महिला पळून गेली. याच गर्दीत या खिसेकापू महिलेला बाजारकरूंनी पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. याबाबत अनिल गव्हाणे यांच्या फिर्यादी वरून लक्ष्मी व्यंकटेश शेहकर रागुंताकूल जिल्हा कर्नूल कर्नाटक या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याच ठिकाणी रावसाहेब दादा खामकर रा.येळपणे यांचा ही खिसेकापून दहा हजार रुपये चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे

शुक्रवारी काष्टीत दुधाचा पगार करण्यासाठी बँकेतून काढलेली दोन लाख 69 हजार रुपयांची रोकड ठेवलेली पिशवी चोरट्यानी भरदिवसा लांबवल्याची घटना दुपारी बारा ते सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावातील गोपाळ दूध डेअरीजवळ घडली होती. आता दुसर्‍या दिवशी अशी घटना घडली.

नाव लक्ष्मी व्यंकटेश आणि खिसे साफ करण्याचे काम
याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेली महिला कर्नाटक मधील असून फिर्यादीत नावाप्रमाणे लक्ष्मी व्यंकटेश शेहकर असे या महिलेचे नाव आहे. हे नाव खरे का खोटे याची खात्री झाली नसली तरी नाव लक्ष्मी व्यंकटेश असल्याने काम मात्र खिसे साफ करण्याचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या